संस्था

शिक्षण महर्षी प. पूज्य गो. ज्ञा. उर्फ डॉ . बापुजी साळुंखे यांचे “ ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार “ या ध्येयापासून स्फूर्ती व प्रेरणा घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शेकडो मैल दूर विखरलेली संस्कृती केंद्रे पाहता ह्या शाखामधून अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या गुरुदेव , शिक्षक कार्यकर्ते व सेवकांना त्यांचे अडचणीचे वेळी आर्थिक दिलासा मिळून त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविल्या जाव्यात व सभासदांच्या भावी आयुष्याची बचतीची सोय व्हावी व वृद्धापकाळ सुरळीत जावा यास्तव ही पतसंस्थारूपी सहकाराची निर्मळ गंगा त्यांचेपर्यंत पोहचवावी व सदस्यांमध्ये काटकसर , स्वावलंबन व सहकार यांचे प्रचारास उत्तेजन मिळावे यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित , कोल्हापूर ही संस्था रजि .न. के.पी.आर./बी.एन.के./३६ दिनांक १९ ऑक्टोंबर, १९७७ ई. रोजी स्थापन झाली. मातृसंस्थेच्या विशाल छायेखाली मा.प्रा.श्री.अभयकुमार साळुंखेसो यांच्या प्रयत्नाने करवीर नगरीत संस्थेची सुरुवात झाली .

आजपर्यंत अनेक सदस्यांनी संस्थेच्या पतपुरवठ्यामधून मुलामुलींचे शिक्षण , लग्न , जागा , जमीन खरेदी व्यवहार , शेतीसुधारणा , घरबांधणी ई . विधायक कामे पुरी करणेत यशस्वी झाली आहेत . संस्थेने आपल्या जीवनामधील येणारे अनेक अडथळे कार्यक्षमपणे बाजूला करून आपल्या विकासाची गंगा वाहात ठेवली आहे . सभासदाचे हिताची जपणूक करून व सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार व सभासद पाल्य पुरस्कार यासारख्या योजना राबवूण संस्थेने आपले दायित्व पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे .

सभासदाचे आकस्मित होणारे मृत्यूमुळे त्यांचे वारसाची होणारी आर्थिक वाताहत व जामीनदार यांचेवर होणारा आर्थिक त्रास कमी करणेसाठी संस्थेने रुपये १ लाख पर्यंतची समूह विमा योजना सुरु केली आहे. सध्याच्या वाढीव मंजुरीचा विचार करून संस्थेच्या ३८ व्या वार्षिक साधारण सभेमध्ये सभासद कर्जमुक्ती कल्याण ठेव योजना मंजूर करून त्यास मा.सहकार आयुक्त व निबंधाकसो यांचेकडून परवानगी मिळवली आहे . सदर योजना येणारे ३९ व्या वार्षिक सभेपासून सुरु केली जाणार आहे.

संस्थेने एखादा अपवाद वगळता आतापर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा आज अखेर चालू ठेवली असून त्यामुळे संस्थेचे श्रम , पैसा व वेळ यामध्ये बचत झाली आहे . याचे सर्व श्रेय सुज्ञ सभासदांचे आहे .

संस्थेने आधुनिक बँकिंग प्रणालीचा स्वीकार करून संगणकीय कामकाज सुरु केले आहे . तसेच सी.बी.एस. संगणक प्रणाली स्वीकारली आहे . आधुनिक बँकिंग प्रणालीचा सभासदांना फायदा व्हावा यासाठी NEFT & RTGS यासारख्या योजना युनियन बँक ऑफ इंडिया व्दारे उपलब्ध केली आहे .

संस्था सध्या स्वभांडवलावर कारभार करीत आहे . संस्थेचे स्वभांडवल व ठेवीमध्ये तसेच कर्जामध्ये संस्थेचे पारदर्शक कामकाज प्रणालीमुळे वाढ झाली आहे . सभासदांना त्यांनी संस्थेशी केलेल्या व्यवहाराची माहिती मोबाईल एस.एम.एस. व्दारे तात्काळ पाठवली जात असलेने त्यांचा व्यवहाराबाबत साशंकता राहणार नाही याची दक्षता संस्थेमार्फत घेतली आहे .

संस्थेच्या वाढीमध्ये शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ. शुभांगी गावडे म्याडम यांनी आपल्या शिक्षण संस्थेचे अजिवसेवक , पदाधिकारी व कर्मचारीवर्ग यांच्या सहाय्याने वेळोवेळी सहकार्य करून संस्थेच्या विकासाची गंगा अखंडपणे वाहात ठेवणेसाठी मोलाचे सहकार्य केले आहे .